
सौ.अवनी अजय सांबरे
सरपंच
avanisambare7@gmail.com

श्री.अजय गोपीनाथ चौधरी
उपसरपंच
ajaychaudhari871@gmail.com

सौ.रीना अमित पिंपळे
ग्रामपंचायत अधिकारी
reenapimple266@gmail.com
हमरापूर गाव...
हमरापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे.गावाच्या उत्तरेला विक्रमगड तालुका, पूर्वेला शहापूर तालुका, पश्चिमेला पालघर तालुका आहे.
वाडा बस स्थानकापासूनराष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने गेल्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव २२ किमी अंतरावर आहे.गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात.पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.